Ladaki bahin yojana: कधी मिळणार जानेवारीचा हप्ता.
महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून ‘ मुख्यमंत्री लडकी बहीण योजना ‘ सुरू केले, या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते देण्यात आले. पण सध्या ओढ लागली आहे ते जानेवारी चा हप्ता कधी येतोय याची. १५०० रु येणार की २१०० रु येणार यावरही गोंधळ सुरू झाला आहे. पण नुकताच मिळालेल्या बातमीनुसार जवळपास 60 लाख लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत. दहा हजार अर्ज आत्तापर्यंत रद्द करण्यात आलेले आहेत राहिलेले अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना इथे तीळ संक्रातीला २१०० रु देऊन संक्रात गोड करणार असा बातम्या आपण ऐकत होतो. सध्या तरी मिळण्यात विलंब होत आहे.
२१०० मार्च नंतर मिळणार?
कुठली योजना सुरू करण्यापूर्वी योजनेचा बचत हा तयार केला जातो. निवडणूक चालू असतानाच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० देण्याची घोषित केले होते. पण कोणत्याही योजनेत अचानक असे बदल करता येत नाहीत असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळेच मार्च पर्यंत तरी म्हणजेच येणार वर्षाचे बजेट घोषित होईपर्यंत तरी पंधराशे रुपयेच मिळणार असे दिसून येत. येणारा बजेटमध्ये 2100 रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो.
महायुतीचे नेते आणि माझे मंत्री छगन भुजबळ त्यांनी बोलताना लाडक्या बहिणींना विनंती केली आहे कि च्या महिला यांनी कशामध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव कमी करावे. आतापर्यंत दिल्या गेलेली रक्कम ही परत मागणार नाही, पण तक्रार आल्यास त्या महिलेवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही सरकारने दिला आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहुत योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या मूळ नियमांमध्ये कुठेही बदल होणार नाही. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्यांचे अर्थ रद्द करण्यात येतील
जानेवारी चा हप्ता लवकरच मिळेल अशी महिलांना अपेक्षा आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या मतदानाने माहितीचे सरकार निवडून आले अशा लाडक्या बहिणीला सरकारी नाराज करणार नाही.