Ladaki bahin yojana: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार ७ वा हप्ता.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू करताना सर्व महिलांचे सरसकट अर्ज ते करण्यात आले होते. योजनेचा पंधराशे रुपयांचा ६ वा हप्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील सर्व महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्यात आले. पण सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या सर्व निकषांचा विचार करता असे आठवण आली की ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांना योजनेचा जास्त फायदा झाला आहे. म्हणून सरकारने लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्याचे ठरवले होते.
निकषात न बसणाऱ्या महिलांच्या खात्यातून सरकार पैसे परत घेणार अशा अफवा होत्या. पण यावर स्पष्टीकरण देताना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कि ” सध्यातरी सरकारचा असा कुठला निर्णय नाही आहे कि बनावटी लाभार्थ्यांच्या खात्यातून पैसे सरकार घेणार नाही. पण सरकारने त्यांना आवाहन केले आहे”
लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला स्वतःहून पुढे येऊन आतापर्यंत अनेक महिलांनी योजनेचे पैसे सरकारला परत केले आहे. मात्र दिलेले पैसे परत घेण्याचा कुठलाही विचार सरकारचा नाही. पण तरीही यापुढे योजनेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ व्हावा यासाठी सरकार उपयोजना तयार करणारा आहे.
निकषात न बसणाऱ्या महिला यापुढे आपोआप या योजनेतून वगळल्या जातील.
या योजनेचे नवीन निकष नाही आहेत, आमचे निकष योजना सुरू करताना दिले होते तेच निकष आताही असतील.
७ वा हफ्ता कधी मिळणार.
आदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाल्या, या योजनेचा सातवा हप्ता हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात येईल. यावेळी लाभार्थींची संख्या पूर्वीपेक्षा कमी झालेली असतील.