18000 ऐवजी मिळणार फक्त 12000
लाडकी बहीण योजना
Ladaki Bahin Yojana
नुकत्यच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा होता, पण राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार वीस लाखाहून अधिक शेतकरी महिला ज्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी मार्फत मिळत असलेल्या लाभांमुळे लडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी मुकावे लागणार आहे,
महिला व बालविकास मंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की ” लाडकी बहीण योजनेच्या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अन्य योजनेतून लाभ घेतलेल्या रकमेच्या वरील रक्कम लडकी बहीण योजनेतून देण्यात येणार आहे त्यासाठी आम्ही कृषी विभागाशी समन्वय साधून बिल कारवाई करू ”
ज्या 20 लाख महिला आहेत नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या लाभार्थी आहेत त्यामुळे त्यांना 18000 ऐवजी वार्षिक 12 हजार रुपये देण्यात येतील
आत्तापर्यंत सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 हजार 600 कोटी एवढी रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली आहे