इयत्ता बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार 12th hall ticket, 12th addmit card.
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी बोर्डाने हॉल तिकीट आजपासून देण्याचे जाहीर केले. आज पासून ते बोर्डाच्या संकेतस्थळावर तुम्हाला मिळतील. शाळा आणि कॉलेज यांनी हॉल तिकीट ची प्रिंट विद्यार्थ्यांना कोणताही विना करता देण्यात यावे असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे चेअरमन देवदास कुलाल यांनी ही माहिती प्रेस रिलीज मधून देण्यात आली आहे. येता बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत होणार आहे.
हॉल तिकीट वाटप बद्दल निर्देश
हॉल तिकीट वाटप :- शाळा आणि कॉलेज यांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देणे बंधनकारक आहे त्यासाठी कुठलीही फी आकारण्यात येणार नाही.
फोटो :- जर हॉल तिकीट वर फोटो व्यवस्थित नसेल तर शाळा आणि कॉलेज यांनी हॉल तिकीट वर व्यवस्थित असलेला फोटो चिटकवावा आणि त्यावरच टाईम मारून हेडमास्टर किंवा प्रिन्सिपल यांची स्वाक्षरी असावी.
हॉल तिकीट हरवल्यास:- जर विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट हरवले असेल तर विद्यार्थ्यांना दुय्यम प्रत देण्यात यावी अनिल रेड पेन ने त्यावर दुय्यम प्रत असे नमूद करावे.
देविदास कुलर यांनी हॉल तिकीट मध्ये दुरुस्ती करण्याचे प्रोसिजर सांगितले आहे जर हॉल तिकीट वर विद्यार्थ्याचे नाव आईचे नाव किंवा जन्मदिनांक चुकीचे असल्यास बदल करता येतील.