पॅन कार्ड च्या फसवीगिरीने पोस्टाच्या खात्यातून लाखो रुपयाची चोरी: Indian post Payment Bankt
तुमची जर पोस्टाच्या बँकेत खाते सावध रहा, कारण तुमच्या पोस्टच्या खात्यामधून तुमच्या पॅन कार्डचा वापर करून पैसे काढले जात आहेत. आतापर्यंत अनेक इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांच्या खात्यातून पॅन कार्डचा वापर करून त्यांचे खाते रिकामी करण्यात आली आहे. तुम्ही अशा घटनेला बळी पडाल त्यापूर्वी सावध रहा, तुम्हाला हे कॉल किंवा मेसेज येऊ शकतो आणि पॅन कार्ड बद्दलचे तुम्हाला तुमची संवेदनशील माहिती मागू शकतात, आणि याच माहितीचा वापर करून तुमच्या खात्यातील रक्कम ते काढून घेतात,
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने, आपल्याला खूप ग्राहकांना सायबर क्राईम पासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक असे कुठलेही मेसेज अथवा कॉल आपल्या ग्राहकांना करत नाही जर तुम्हाला असा कॉल किंवा मेसेज आला असेल आणि त्यावर सांगितलं असेल तुमचं पॅन कार्ड ची माहिती अपडेट करा नाहीतर तुमचे खाते बंद करण्यात येईल आणि ती लिंक सुद्धा देतात, त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमची माहिती अपडेट कराल तर तुम्ही याला बळी पडले असे समजा, असे येणारे मेसेज हे फसवे मेसेज आहेत त्यामुळे अशा कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
असा येतो मेसेज
” तुम्ही तुमचे पॅन कार्ड अपडेट न केल्यास तुमची पोस्ट पेमेंट बँक खाते इथे 24 तासात ब्लॉक केले जाईल”
असे मेसेज अनेकांना येत आहेत, त्यामुळे ग्राहकांनी अशा कुठल्याही मेसेजला बळी पडू नये असा इशारा पोस्टमन बँकेने दिला आहे,
काय करावे?
Oतुमचं खातं जर पोस्ट पेमेंट बँकेमध्ये असेल तर पोस्टमध्ये पासवर्ड नियमितपणे अपडेट करणे, बनावट ग्राहक सेवा क्रमांक पासून दूर राहणे, खात्याचे निरीक्षण करणे आणि संसद लिंक क्लिक करणे टाळणे, सार्वजनिक वाय-फाय चा वापर करू नये, या मुळे तुमचे खाते सुरक्षित राहू शकतात.