लाडकी बहीण योजना : 2100 रुपये देण्याबद्दल  अद्याप निर्णय नाही. Ladaki bahin yojana

लाडकी बहीण योजना : 2100 रुपये देण्याबद्दल  अद्याप निर्णय नाही.

Ladaki bahin yojana

विधानसभा निवडणूक झाली, मंत्रिमंडळ ही नेमण्यात आलं, अधिवेशनही पार पडल. मंत्रिमंडळाची बैठक ही झाली, पण अद्याप 2100 रुपयाचा हप्ता देण्यावर निर्णय झाला नाही, याउलट पंधराशे रुपये मिळत असलेला हप्ताही काही महिलांचा अपात्र ठरवल्या जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर असे सांगण्यात आले की रकमेत वाढ करण्यासाठी अर्थसंकल्प सादर करावा लागतो अर्थसंकल्प त्याची वाढ करण्यात येते त्यासाठी विशेष रक्कम अर्थसंकल्पात वाढवावी लागते आणि त्यानंतरच निर्णय घेण्यात येतो म्हणजे यावरूनच असे लक्षात येते की, अद्याप सरकारने आपल्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये यातच खुश ठेवण्याचा निर्णय घेतला. 2100 रुपये हप्ता मिळवण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पाची वाट बघावी लागेल.

गेल्या विधानसभा  निवडणुकीमध्ये मस्त स्टोक ठरलेली योजना म्हणजे “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना” ladaki bahin yojana ज्या योजनेने मारुती सरकारला घवघवीत यश मिळवून दिले. आणि याच श्रेय महिलांना देण्यात आलं. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना सहा हप्ते देण्यात आले. सहावा हप्ता नेमकच डिसेंबर मध्ये देण्यात आला. निवडणुकीच्या काळात महिलांना दीड हजार रुपये देण्यात येणार होते पण सध्या मात्र 2100 रुपये देण्याचे सरकारने आश्वासन महिलांना दिले होते. पण अद्यापही सरकार या 2100 रुपयांचा निर्णय घेण्यात आलेला नाही. आणि आता हे 2100 रुपये कधी मिळणार चर्चाच असताना बद्दल आता नवीन माहिती समोर आली आहे. नवीन स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत लडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तसेच काही निकषही बदलण्यात आलेले आहेत.

ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आहे त्या महिलांचे अर्ज सोडून इतर सर्व मुलांच्या अर्जांची फेर तपासणी होणार आहे. हे निकष बदलण्याची कारण अशी की महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमधून सरकारकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत जे लोक यांनी कशात बसत नाहीत त्यांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याचे आढळून आले आहे.

महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे ह्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या ” येणाऱ्या काळात काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेच्या संदर्भात तक्रार करण्यात आली तर तिच्या अर्जाची फेर तपासणी करण्यात येईल. आणि असे आढळून आल्यास त्या महिलेला अपात्र ठरविण्यात येईल.”

 अपात्र असण्याची कारणे

1. कुटुंबाचे अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्यास

2. घरात कोणाच्याही नावाने चार चाकी गाडी असल्यास

3. घरामध्ये कोणालाही शासकीय नोकरी असेल तर

4. आधार कार्ड वरील नाव आणि बँकेच्या खात्यावरील नाव वेगळे असल्यास

5. कोणत्याही एका सरकारी योजनेचा लाभ घेत असल्यास

6. ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा भारताबाहेर गेले असल्यास

More From Author

इयत्ता बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार, 12th hall ticket

पॅन कार्ड च्या फसवीगिरीने पोस्टाच्या खात्यातून( इंडियन पोस्ट पेमेंट बँक ) लाखो रुपयाची चोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *