thekastkar.com

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: शेतकऱ्यांच्या भविष्याची योजना.Pradhanmantri kisaan mandhan yojjna

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: Pradhanmantri Kisaan mandhan yojjana

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: शेतकऱ्यांच्या भविष्याची योजना.Pradhanmantri


kisaan mandhan yojjna


प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2019 साली सुरू केलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात निवृत्तीवेतनाद्वारे आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.

प्रधानमंत्री किसन मानधन योजना :- केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करता त्यांनाही त्यांच्या वृद्धपकाळात मदत म्हणून पेन्शन मिळावी यासाठी ही योजना तयार केली गेली आहे. योजना 2019 मध्ये सुरू केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या वयानुसार ठराविक रक्कम पेन्शन फंडमध्ये बचत करायची आहे. जेवढी रक्कम शेतकऱ्याची जमा होईल तेवढीच रक्कम त्यात केंद्र सरकार देणार आहे. वयाच्या साठाव्या वर्षी रक्कम जमा करणे थांबून शेतकऱ्याला पेन्शन चालू होते. आतापर्यंत लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.


▶️ खालील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 १. जे शेतकरी राष्ट्रीय निवृत्ती योजना, कर्मचारी बीमा योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्कीम, यासारख्या योजनांचा लाभ घेत असलेले शेतकरी अपात्र असतील.

२.कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनांमध्ये निवडण्यात आलेले शेतकरी.

३.जमीन धारण करणारी संस्था
संविधानिक पद धारण करणारी व्यक्ती, आमदार, खासदार,महापौर,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदी.

४.केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी.

५.आयकर भरत असलेला व्यक्ती.

नोंदणी करून डॉक्टर, वकील, अभियंता.

६.उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी.

7.अडीच हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकरी.

▶️ योजनेचे वैशिष्ट्ये.

१. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी पात्र असतील.

२. वयाच्या 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकऱ्यांसाठी

३. आनंददायी पेन्शन सुरू राहणार

४. प्रति माह तीन हजार रुपये इतकी रक्कम वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन स्वरूपात मिळणार

५. पत्र शेतकऱ्यास वयानुसार 55 ते 200 रुपये पर्यंत मासिक हप्ता पेन्शन फंडात जमा होतो.

६. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास मिळणारी पेन्शन त्याच्या पत्नीस पण दीड हजार रुपये प्रति महिना अशी मिळणार.

 ▶️आवश्यक कागदपत्रे.

१. शेतकऱ्याच्या नावावर सातबारा

२. आठ- अ उतारा

३. बँक खाते आधार कार्ड ची लिंक केलेले असावे

४. मोबाईल क्रमांक

५. आधार कार्ड नुसार जन्मतारीख असायला हवी

६. सीएससी केंद्रात ऑनलाईन फॉर्म भरता येतात.

नोंदणी कशी करावी?

Exit mobile version