RRB Group D भरती 2025 जाहिरात आली : 32,438 पदांसाठी भरती,

RRB Group D भरती 2025 जाहिरात आली : 32,438 पदांसाठी भरती,

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने ग्रुप D साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे, जी CEN क्रमांक 08/2024 अंतर्गत येते. रेल्वेकडून एकूण 32,438 पदांसाठी भरती होणार आहे. उमेदवार 23 जानेवारी 2025 पासून अर्ज करू शकतात, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची संगणक आधारित चाचणी (CBT), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), कागदपत्र पडताळणी (DV), वैद्यकीय तपासणी (ME) आणि अंतिम यादीत निवड केली जाईल.

ही भरती विविध विभागांमध्ये लेव्हल-1 पदांसाठी होणार आहे, जसे की ट्रॅक मेंटेनर ग्रेड-IV, तांत्रिक विभाग (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि S&T) मध्ये हेल्पर/असिस्टंट, असिस्टंट पॉइंट्समन आणि इतर लेव्हल-1 भूमिका.

RRB Group D 2025 रिक्त जागा

RRB group D 2025 मध्ये खालील प्रमाणे जागा दिलेल्या आहेत.

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या
पॉइंट्समन-B 5058
असिस्टंट (ट्रॅक मशीन) 799
असिस्टंट (ब्रिज) 301
ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV 13187
असिस्टंट P-Way 247
असिस्टंट (C&W) 2587
असिस्टंट TRD 1381
असिस्टंट (S&T) 2012
असिस्टंट लोको शेड (डिझेल) 420
असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल) 950
असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल) 744
असिस्टंट TL & AC 1041
असिस्टंट TL & AC (वर्कशॉप) 624
असिस्टंट (वर्कशॉप) (मेकॅनिकल) 3077


RRB Group D 2025 महत्त्वाच्या तारखा
खाली दिलेल्या  महत्त्वाच्या तारखा तपासा:

RRB Group D जाहिराती नुसार  22 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू 23 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025
अर्ज दुरुस्ती विंडो 25 फेब्रुवारी – 6 मार्च

RRB Group D 2025 पात्रता

शैक्षणिक पात्रता: ITI किंवा कोर्स पूर्ण केलेल्या Act Apprentices यांची पात्रता आवश्यक. इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री स्वीकारली जाणार नाही.

वयोमर्यादा: 18 ते 36 वर्षे

RRB Group D निवड प्रक्रिया 2025
निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल:

संगणक आधारित चाचणी (CBT)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
कागदपत्र पडताळणी (DV)
वैद्यकीय तपासणी (ME)

RRB Group D CBT परीक्षा स्वरूप

सामान्य विज्ञान: 25 प्रश्न (25 गुण)
गणित: 25 प्रश्न (25 गुण)
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती: 30 प्रश्न (30 गुण)
सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी: 30 प्रश्न (30 गुण)
नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.

RRB Group D अर्ज कसा करायचा?

ज्या RRB मध्ये तुम्हाला अर्ज करायचा त्या RRB च्या WEBSITE ला भेट द्या
‘नवीन नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरा.
नोंदणी झाल्यावर OTP च्या माध्यमातून ईमेल आणि मोबाइल नंबर सत्यापित करा.
लॉगिन करून अर्ज भरा.
अर्ज पूर्ण झाल्यावर फी भरण्यासाठी पुढील पानावर जा.
फोटो, सही, आणि इतर आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन अपलोड करा.

अर्ज शुल्क:

SC/ST/महिला/Transgender/इतर मागासवर्गीय (EBC): ₹250 (CBT ला उपस्थित राहिल्यानंतर परतावा मिळेल).
इतर उमेदवार: ₹500 (₹400 परतावा मिळेल).
RRB Group D पगार:
मूल वेतन: ₹18,000 (7व्या वेतन आयोगानुसार)
भत्ते: DA, HRA, TA, इत्यादी
सुविधा: रेल्वे प्रवास, वैद्यकीय सेवा

More From Author

Chhaava: वीर मराठ्यांच्या शौर्यगाथा घेऊन येत आहे Chhaava, विकी कौशलचा ऐतिहासिक लूक व्हायरल

Samsung ने लॉन्च किया शानदार Samsung Galaxy C55 5G, सिर्फ ₹11,799 में – जानें features.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *