प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला तब्बल 20,000,00 घरे.
प्रधानमंत्री आवास योजने पासून वंचित असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे, आता सहज मोबाईल वरून तुम्ही अर्ज करू शकता, या संदर्भात ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाने गाईडलाईन प्रसारित केली आहे. यासाठी काही नवीन काही नियम या योजनेत समाविष्ट केले आहेत, सर्वे करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2025 करिता महाराष्ट्रासाठी नवीन 13 लाख 29 हजार 678 घर बांधण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे आणि उर्वरित सहा लाख 37 हजार 89 घरांचा विस्तार करणार असल्याचं घोषित करण्यात आले आहे, विस्तारित घरे आणि नवीन घरांची संख्या ढोबळ मानाने गृहीत धरल्यास जवळजवळ वीस लाख इतके होते.
आजवर कुठल्याही राज्याला देण्यात येणाऱ्या घरांच्या संख्येशी तुलना करता असे आढळून येते की ही संख्या सर्वात जास्त आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महाराष्ट्राला तब्बल वीस लाख घरे देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये खालील प्रमाणे अनुदान देण्यात येते.
ग्रामीण भागात – 1,20,000/-
डोंगराळ भागात -1,30,000/-
* लाभार्थ्याची निवड मात्र करण्याचा अधिकार सभेस देण्यात आलेला आहे
लाभार्थी निवड प्रक्रिया
सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी (Generated Priority List) ची कॉपी आवास सॉफ्ट (Awaas Soft) वर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येते.
लाभार्थी निवड करण्यासाठी लाभार्थी खालील नियमांमध्ये असायला हवा.
1. 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब
2. महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब
3. पंचवीस वर्षावरील अशिक्षित/निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब
4. भूमिहीन कुटुंब ज्याची उत्पन्न स्त्रोत मूलमजुरी आहे
5. अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ
व्यक्ती नाही
6. सदरील नियमांच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल
जाणून घ्या कुणाला मिळणार नाही हा लाभ
ज्या परिवाराकडे मोटरसायकल किंवा फोर व्हीलर आहे.
किंवा किसान कार्ड आहे ( क्रेडिट पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त )
परिवारामध्ये सरकारी नोकरी नसल्यास किंवा परिवारामध्ये सदस्याची मासिक इन्कम पंधरा हजाराच्या वर आहे, किंवा परिवारामध्ये बिझनेस लोन घेतलेला आहे, अडीच हेक्टर पेक्षा जास्त शेती असल्यास तो परिवार अपात्र ठरेल,
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज हा तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये करावा लागेल किंवा मोबाईल ॲप द्वारे सुद्धा अर्ज करू शकता.
आवास प्लस ॲप
तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून तुमच्या मोबाईलवर आवाज प्लस ॲप डाऊनलोड करा आणि त्यावर आपली माहिती भरा किंवा तुम्ही पंचायत समितीमध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकता,
या योजनेअंतर्गत आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे असतील.
1. सातबारा उतारा/ मालमत्ता नोंद पत्र / ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र,आधार कार्ड, राशन कार्ड / निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल,
2. मनरेगा जॉब कार्ड
3. बँक पासबुक छायांकित प्रत
ही सगळी कागदपत्रे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये द्यायचे आहेत.