६० लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येणार का? Ladaki bahin yojana latest update.
Ladaki bahin yojana latest update
Ladaki bahin yojana 60 lakh ladakya bahinina yojnetun vaglyat yenar.
राज्यातील महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून, महायुती सरकारने 2024 24 ला ‘लाडकी बहीण योजना’ अमलात आणली त्यानुसार लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचे सरकारने ठरवले होते. जेवढ्या महिलांनी अर्ज केले तेवढ्या सगळ्या महिलांचे सरसकट अर्ज स्वीकारण्यात आले. ६ आत्तापर्यंतचे पैसे सगळ्या महिलांना देण्यात आले.
निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपयां ऐवजी 2100 रुपये प्रति महिन्यात देण्याचे आश्वासन केले होते. पण ते आश्वासन पूर्ण करण्यापूर्वीच राज्य सरकारने जवळपास 60 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्याचे ठरवले आहे. त्याचे पालन न केलेल्या महिलांना या योजनेपासून मुखावे लागेल सरकारने काही अटी दिल्या होत्या त्याचे पूर्णपणे पालन झाल्याने सरकारने घेतला आहे.
महायुतीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की ” लाडकी बहीण योजनेचा फायदा काही प्रमाणात नको त्यांना झाला आहे. मात्र त्यावेळेस नियम काही वेगळे होते. घरात दोन महिलांना आर्थिक लाभ घेता येणार नाही. ज्यांच्याकडे मोटार गाडी आहे त्यांना लाभ घेता येणार. गरिबांना लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे. अशी नियमत बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव कमी केले पाहिजे. पैसे आत्तापर्यंत दिले गेले ते वापस मागण्यात काही अर्थ नाही. आत्तापर्यंतचे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण. याच्यापुढे लोकांना सांगावे. ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव काढून घ्यावे. अन्यथा सरकारने दंडासह वसुली करावी”
-
कोणत्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार?
१. या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर असून सुद्धा लाभ घेत असतील तर त्यांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे.
२. ज्या महिलांकडे चार चाकी आहे आणि तरीसुद्धा त्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्या अर्जाची ही पडताळणी होणार आहे.
३. आधार कार्ड वर इतर दिलेल्या कागदपत्रांमध्ये नावात किंवा इतर ठिकाणी तफावत आढळल्यास, अशाही अर्जाची तपासणी होणार आहे.
४. एकाच महिलेने जर दोन अर्ज केले असतील तर त्यापैकी एकच अर्थ ग्राह्य धरण्यात येणार आहे.
५. लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात लग्न केलेल्या महिलांची ही येणार आहे.
६. या योजनेचा लाभ घेत असलेली महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्याही अर्जाची तपासणी होणार आहे.
ज्यांनी वरील सर्व निकषांचे पालन केले असेल अशा महिलांना काहीही घाबरण्याचं कारण नाही.
जानेवारी चा हप्ता मिळण्यापूर्वीच बऱ्याच ठिकाणी अर्जाची छाननी करून अर्ज बाद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बरेच ठिकाणी अर्ज वगळण्यात आलेले आहेत. जवळपास १०,००० हुन अधिक फॉर्म वेगवेगळ्या विभागातून रद्द करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने महिलांना आवाहन केले आहे की ज्या महिला वरील निकषांमध्ये बसत नाहीत असे महिलांनी स्वतःyojana काढून घ्यावे.