PMEGP Loan Yojana: 50 लाखापर्यंतच लोन मिळवा तेही आधार कार्डवर सोबत ३५% सबसिडी.
PMEGP Loan Yojana: प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत या योजनेमार्फत शहरी व ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योगांना बळकटी देण्यासाठी या योजनेमार्फत 50 लाखापर्यंत केंद्र सरकारतर्फे लोन देण्यात येते. त्याचबरोबर स्वयंरोजगाराला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना ‘खादी आणि ग्राम उद्योग आयोग’ मार्फत चालवली जाते.
▶️ पात्रता
१. अर्जदाराचे वय हे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
२. सहकारी संस्था, धर्मादाय संस्था स्वयं- सहाय्यता संस्था यांनाही अर्ज करता येतो.
३. जर कोणी नवीन व्यवसाय सुरू करणार असेल अशा अर्जदारांना जास्त प्राधान्य दिले जाते.
४. उत्पादन क्षेत्रात ₹१० लाखांपेक्षा अधिक किंवा सेवा क्षेत्रात ₹५ लाखांपेक्षा अधिक प्रकल्पांसाठी किमान ८वी उत्तीर्ण आवश्यक आहे.
▶️कर्जाची रक्कम.
१. प्रोडक्शन क्षेत्रासाठी -५० लाख
२. सेवा क्षेत्रासाठी – 20 लाख
अशाप्रकारे या योजनेमार्फत रक्कम दिली जाते. सोबतच अनुदान देखील दिले जाते मात्र ते शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या निकषावर दिले जाते. ते खालील प्रमाणे.
▶️ग्रामीण भागाकरिता
सर्वसामान्य वर्ग :- २५%
मागासवर्गीय/ महिला/ अन्य विशेष गट:- ३५%
▶️शहरी भागाकरिता
सर्व सामान्य वर्ग :- १५%
मागासवर्गीय/ महिला/ अन्य विशेष गट :- २५
▶️ अर्ज कसा कराल?
अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतो अर्ज हा तुम्हाला खादी व ग्राम उद्योग आयोग (KVIC) च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन भरावा लागेल.
Website: www.kviconline.gov. in
▶️ आवश्यक कागदपत्रे.
१. आधार कार्ड
२. तुमचे उद्योगाचा प्रकल्प अहवाल.
३. उत्पन्न प्रमाणपत्र
४. अद्यावत फोटो. इत्यादी.
या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातील होणारे स्थलांतरण थांबवण्याकरिता गावातच रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने गावात रोजगाराचे साधन गावातच मिळावे या योजनेला प्रामुख्याने भर दिला गेला आहे. त्यासोबतच विद्युत स्थापन करण्याकरता तीन ते पाच वर्षापर्यंत अनुदान व कर्जाची सुलभ व्यवस्था निर्माण केली गेली आहे.
अधिक माहितीसाठी :- तुमच्या जवळच्या खादी आणि ग्राम उद्योग आयोग कार्यालयाशी संपर्क साधावा